Join us

आळंदी-देहू-पंढरपूर पालखी मार्गाचे चौपदरीकरण

By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST

नितीन गडकरी यांची घोषणा- सोलापूर-अक्कलकोट- गुलबर्गा मार्ग चौपदरीकरण करणार

नितीन गडकरी यांची घोषणा- सोलापूर-अक्कलकोट- गुलबर्गा मार्ग चौपदरीकरण करणार
सोलापूर: आळंदी ते पंढरपूर हा संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग तसेच देहू ते पंढरपूर हा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग या दोन्हीही पालखी मार्गांचे चौपदरीकरण करण्याचा तसेच सोलापूर ते अक्कलकोट-गाणगापूर आणि गुलबर्गा या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे तसेच पॉवरग्रीडचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता़ त्यावेळी गडकरी बोलत होत़े पुणे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे 210 किलोमीटर चौपदरीकरण काम झाल़े सोलापूर ते भीमानगर हे काम आयएल अँण्ड एफएस या कंपनीने केल़े याशिवाय सोलापूर ते येडशी आणि सोलापूर ते संगारेड्डी या कामाचा देखील यावेळी कोनशिला समारंभ पार पडला, त्यावेळी गडकरी बोलत होत़े
गडकरी म्हणाले, रस्त्याच्या विकासामुळे समृद्धता येत़े महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी सर्व तीर्थक्षेत्रे ही महामार्गाने जोडण्याचे ध्येय ठेवले असून, त्यानुसार या पालखी मार्गाचे सिमेंटचे मजबूत रस्ते करुन चौपदरीकरण केले जाईल, अशी घोषणा गडकरी यांनी केली़ त्या पद्धतीने सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर- गुलबर्गा या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणा गडकरी यांनी केली़ देशात रस्ते विकासाचे नवीन धोरण जाहीर केले जात असून, येत्या दोन वर्षात रस्त्यामध्ये खूप काम करु आणि आमच्या कामामुळे देशाच्या जीडीपीमध्ये दोन टक्के वाढ होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला़ इन्फ्रास्ट्र?र, ई गव्हर्नन्स, तसेच तंत्रज्ञानावर पंतप्रधान मोदी भर देत असल्यामुळे देश अंधकारमुक्त होईल, जगात क्रमांक एकचा देश होईल, असेही गडकरी म्हणाल़े
चौकट़़़
जपानी राजदूत अन् टीम
या कार्यक्रमास जपानचे भारतातील राजदूत टेकेशी यागी, उच्चायुक्त क़े ई़ माशुदा, आयएलएफएस ग्रुपचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हरी शंकरन, व्यवस्थापकीय संचालक क़ेरामचंद, कार्यकारी संचालक मुकंद सप्रे, उपाध्यक्ष क़ेआऱ खान, नेस्को (ईस्ट) या जपानी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोसे, संचालक मिकियो काक्यामाँ, ऑरिक्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिवोदा, भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक बी़ क़े इखे, संजय कदम, सोलापूर रोड टोलवेज कंपनीचे तसेच पॉवरग्रीडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत़े वन खात्याचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी या महामार्गातील अनेक अडथळे दूर केल़े