नवी दिल्ली: केंद्रातील नवीन सरकारकडून आर्थिक सुधारणांना गती देण्याची आशा निर्माण झाल्याने विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून भारतीय बाजारात जवळपास १७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.११ जुलैपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात ७,५०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, तर रोखे बाजारात ९,२८६ कोटी रुपये गुंतविले. त्यानुसार विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात केलेल्या गुंतवणुकीचा आकडा १६,७९१ कोटी रुपयांवर जातो.वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध उपाय घोषित केले आहे. त्यामुळे आर्थिक सुधारणांना गती मिळेल, असा विश्वास विदेशी गुंतवणूकदारांना वाटतो.(लोकमत न्यूज नेटवर्क)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}