Join us

एक वर्षात भारतात ३२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक

By admin | Updated: December 1, 2015 02:16 IST

देशात आॅक्टोबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या दरम्यान ३२.८७ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली असल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

नवी दिल्ली : देशात आॅक्टोबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या दरम्यान ३२.८७ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली असल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी लोकसभेत दिली. या काळात कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, सेवा, व्यापार, वाहन, रसायन, वीज, औषधी, औद्योगिक मशिनरी, खाद्य विभागात ही विदेशी गुंतवणूक झाली आहे. संरक्षण आणि रेल्वे संबंधित उद्योगात अनुक्रमे ४८ लाख आणि १४६ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली. एका लिखित उत्तरात वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले की, विदेशी गुंतवणूकदार गुंतवणुकीबाबत सकारात्मक आहेत.