Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोर्डही देणार आता वाहन कर्ज

By admin | Updated: December 23, 2014 00:32 IST

फोर्ड क्रेडिट इंडिया या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना वाहनांसाठी कर्ज देण्याची कंपनीची योजना आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेतील प्रख्यात वाहन उत्पादक कंपनी फोर्ड वाहन कर्ज क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. फोर्ड क्रेडिट इंडिया या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना वाहनांसाठी कर्ज देण्याची कंपनीची योजना आहे. पुढील वर्षी ही सेवा सुरू होईल.फोर्ड क्रेडिट इंडियाला बिगर बँकिंग कंपनीच्या स्वरूपात काम करण्याची परवानगी मिळाली आहे. फोर्ड के्रडिट इंडियाचे व्यवस्थापक मार्क कॉन्स्टेबल यांनी एका निवेदनात सांगितले की, २0१५ मध्ये आम्ही कर्ज देण्यास सुरुवात करू. पहिल्या तिमाहीत ठोक डीलरना कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिलीजाईल. किरकोळ ग्राहकांना वर्षअखेरपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध केली जाईल. वाहनांना कर्ज देण्याचा फोर्डकडे ५५ वर्षांचा अनुभव आहे. याचा लाभ कंपनीला भारतात होईल.