Join us  

सेवा क्षेत्रात पाच महिन्यांत प्रथमच झाली रोजगारनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 12:34 PM

एप्रिल २०२२ मध्ये या क्षेत्रातील वृद्धी ५ महिन्यांच्या उच्चांकावर गेली आहे.

बंगळुरू : भारताच्या सेवा क्षेत्रात तेजी दिसून येत असून एप्रिल २०२२ मध्ये या क्षेत्रातील वृद्धी ५ महिन्यांच्या उच्चांकावर गेली आहे. या क्षेत्रात नोव्हेंबरनंतर प्रथमच रोजगार निर्मिती झाल्याचेही दिसून आले आहे. मात्र, सातत्याने वाढणारी महागाई सेवा क्षेत्रासाठी चिंतेचा विषय आहे.

एसअँडपी ग्लोबलचा सेवा क्षेत्र पीएमआय एप्रिलमध्ये वाढून ५७.९  अंकांवर पोहोचला. हा ५ महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. मार्चमध्ये तो ५३.६ अंकांवर होता. एप्रिलमध्ये पीएमआय नोव्हेंबरपासूनच्या काळातील सर्वाधिक उंचीवर पोहोचला आहे. एसअँडपी ग्लोबलच्या आर्थिक सहयोगी संचालिका पॉलियाना डे लिमा यांनी सांगितले की, सेवा क्षेत्रातील पीएमआयची आकडेवारी उत्साहवर्धक आहे. मागणी वाढल्यामुळे नवीन व्यवसाय प्रवाहाला तसेच उत्पादनाला गती मिळाली आहे. त्याचा लाभ सेवा क्षेत्राला झाला आहे.

टॅग्स :नोकरी