कोलकाता : नुकत्याच झालेल्या व्यापारविषयक शिखर बैठकीत झारखंडला ३.१० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळाले आहेत. या प्रस्तावांचा पाठपुरावा झारखंड सरकारकडून सुरू झाला असल्याची माहिती झारखंडच्या खाण मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार बार्नवाल यांनी दिली.झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू आहेत. गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी झारखंड सरकारने बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे केंद्रे सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. खाणी तसेच उत्पादन क्षेत्रासाठी या व्यापार शिखर बैठकीत सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात झारखंडला यश आल्याचे बार्नवाल यांनी सांगितले. या दोन क्षेत्रांसाठी दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. सन २०१९ पर्यंत ७२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांची उभारणी आणि उत्पादन सुरू करण्याचे सरकारचे लक्ष आहे.
झारखंडकडून गुंतवणुकीचा पाठपुरावा
By admin | Updated: March 13, 2017 23:58 IST