Join us  

'फ्लिपकार्ट'चा 'BIG BILLION DAY',  टीव्ही खरेदीवर 70 हजार रुपयापर्यंत सूट  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 7:57 PM

यंदा ई-कॉमर्स कंपन्यांचा फेस्टिव्हल सीजन लवकर सुरु झाला आहे. या आठवड्यातच सर्व ई-कॉमर्स कंपन्या नव-नवीन आकर्षक ऑफर्स ऑनलाइन ग्राहकांसाठी घेऊन येणार आहेत.

ठळक मुद्दे नव-नवीन आकर्षक ऑफर्सअॅमेझॉनवर 70 टक्के सूट फ्लिपकार्टचा बिग लूट सेल

नवी दिल्ली, दि. 18 - यंदा ई-कॉमर्स कंपन्यांचा फेस्टिव्हल सीजन लवकर सुरु झाला आहे. या आठवड्यातच सर्व ई-कॉमर्स कंपन्या नव-नवीन आकर्षक ऑफर्स ऑनलाइन ग्राहकांसाठी घेऊन येणार आहेत.सोशल मीडियात लोकप्रिय असलेली ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी बिग बिलियन डे नावाने सेल आणणार आहे. यामध्ये गॅझेट्स आणि अन्य वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आसुस, मोटोरोला आणि एचटीसी या बजेटमधील स्मार्टफोनवर मोठी सवलत देण्याबाबत ई-कॉमर्स कंपन्या चर्चा करत आहेत. यासोबतच सॅमसंग गॅलॅक्सी एस 7 आणि रेडमी 4A या स्मार्टफोनच्या किंमतीत सुद्धा जास्त सूट मिळणार आहे. लिनोव्हा K8 आणि पॅनासॉनिक Eluga Ray 700 ची चर्चा आहे. फेस्टिव्हल सीजनमधील या सेलला फ्लिपकार्टने बिग लूट असे म्हटले आहे. यामध्ये टीव्ही, फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशीन या वस्तूंवर जवळपास 70 टक्के सवतल देण्याची शक्यता आहे. यामध्ये 32 इंच टीव्हीवर हार्ड-टू-मिस अशी ऑफर सुद्धा आहे. स्मार्ट आणि अल्ट्रा एचडी 4K टीव्हीवर सुद्धा 40 टक्के सूट मिळणार आहे. एवढेच, नव्हे तर मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर 70 हजार रुपयापर्यंतची सवलत देण्यात आली आहे. फॅशन आणि लाइफस्टाइमध्ये 500 ब्रॅंडच्या वस्तूंवर याआधी कधीच नाही, अशी ऑफर असणार आहे. याशिवाय लहान इलेक्ट्रॉनिक वस्तू जशा की डीएसएलआर कॅमे-यासोबत मोफत गिफ्ट, प्रिंटर्सवर एक्सचेंग ऑफर आहे. याबरोबर, अॅपल आयपॅड ईएमआयवर घेता येऊ शकेल, अशी सुविधा ग्राहकांना देण्यात आली आहे. दरम्यान, फ्लिपकार्ट चार दिवसांचा फेस्टिव्हल सेल येत्या 20 सप्टेंबरपासून सुरु करणार आहे. तर, अॅमेझॉनचा सेल 21 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. अॅमेझॉनवर सेलची सुरुवात प्राईम मेंबर्ससाठी 12 तास आधी होणार आहे. अॅमेझॉनने गृह उपयोगी वस्तूंवर आणि फॅशनच्या प्रॉडक्ट्सवर 70 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. मोबाईल फोनवर 40 टक्के, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 60 टक्के सवतल ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय अॅमेझॉनच्या पे अॅपमधून खरेदी करणा-या ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे.