Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅटस््चा आकार २६ टक्के घटला

By admin | Updated: August 19, 2015 22:36 IST

देशातील सात प्रमुख शहरांतील फ्लॅटस्च्या सरासरी आकारात २६ टक्क्यांची घट झाली आहे. जमीन व मालमत्तेच्या उद्योगात मंदी असल्यामुळे

नवी दिल्ली : देशातील सात प्रमुख शहरांतील फ्लॅटस्च्या सरासरी आकारात २६ टक्क्यांची घट झाली आहे. जमीन व मालमत्तेच्या उद्योगात मंदी असल्यामुळे बिल्डर्स आपली विक्री वाढावी म्हणून फ्लॅटस्चे आकार लहान करीत आहेत.जागतिक पातळीवरील रियल्टी कंपनी जेएलएलने एका अहवालात ही माहिती दिली. बिल्डर्स फ्लॅटस्चा आकार लहान करीत असले तरी किमती मात्र कमी करीत नाहीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अपार्टमेंटस्च्या आकारात वर्षाच्या आधारावर सगळ्यात जास्त घट झाली आहे. बंगळुरू, चेन्नईदेखील याच वर्गात आहेत. दिल्ली, एनसीआर, हैदराबाद व पुण्यामध्येही फ्लॅटस्चे आकार कमी झाले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)