Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी कोळसा सचिवांसह पाच जणांना जामीन

By admin | Updated: September 5, 2015 00:49 IST

कोळसा खाणपट्टे वाटपाशी संबंधित एका प्रकरणात शुक्रवारी विशेष न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह पाच जणांना जामीन मंजूर केला.

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपाशी संबंधित एका प्रकरणात शुक्रवारी विशेष न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह पाच जणांना जामीन मंजूर केला.सीबीआयचे विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी गुप्ता यांच्याशिवाय के.एस. क्रोफा, विश्वास सावखंडे आणि ग्रेस इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालकद्वय मुकेश गुप्ता आणि सीमा गुप्ता यांना एक लाख रुपये जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. क्रोफा हे कोळसा मंत्रालयाचे माजी संयुक्त सचिव तर सावखंडे महाराष्ट्र सरकारच्या भूगर्भ आणि खाण संचालनालयाचे संचालक होते. चौकशीत आम्ही संपूर्ण सहकार्य केले असून पुरावे नष्ट करण्याची अथवा पळून जाण्याचीही शक्यता नसल्याने जामीन मंजूर केला जावा, अशी विनंती आरोपींच्यावतीने करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)