Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतात पहिल्यांदाच "अॅमेझॉन प्राइम डे सेल"

By admin | Updated: July 10, 2017 18:32 IST

सोशल मीडियातील ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतातील ऑनलाइन ग्राहकांसाठी एक सेल आणला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - सोशल मीडियातील ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतातील ऑनलाइन ग्राहकांसाठी एक सेल आणला आहे. आजपासून हा सेल सुरु होणार असून अॅमेझॉन प्राइम डे असे या सेलला नाव देण्यात आले आहे. तसेच, हा सेल 30 तास चालणार असून यादरम्यान ग्राहकांना अनेक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. 
अॅमेझॉनने याआधी भारताशिवाय अशाप्रकारच्या सेलचे दोनवेळा आयोजन केले होते. त्यावेळी कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. भारतात अॅमेझॉजनने पहिल्यांदाच प्राइम डे सेल आणला आहे. त्यामुळे या सेलला सुद्धा ऑनलाइन ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याचबरोबर कंपनीच्या माहितीनुसार, प्रत्येक पाच मिनिटाला हजाराहून अधिक नवीन डील्स मिळतील. कंपनीचे भारतातील प्रमुख अमित अग्रवाल यांनी सांगितले की, हा सेल अॅमेझॉन प्राइम युजर्ससाठी असून यामध्ये व्हिडिओ कंटेंटशिवाय बराच वस्तूंवर मोठ्याप्रमाणात सवलत मिळणार आहे. 
प्राइम वर्षांसाठी सब्सक्रिप्शन स्कीम आहे. यामध्ये जलद घरपोच सेवा आणि विशेष डील देण्यात येते. ही स्कीम भारतात गेल्यावर्षी लॉन्च करण्यात आली होती. या स्कीमसाठी ग्राहकाला दरवर्षी 500 रुपये भरावे लागतात.  हा प्राइम डे सेल फक्त अॅमेझॉन प्राइम युजर्ससाठी आहे. प्राइम सब्सक्रिप्शन केले आहे, त्यांच्यासाठीच ऑफर्स मिळणार आहेत.
(Good news: फ्लिपकार्टवर फादर्स डे स्पेशल ऑफर; आयफोन 6 फक्त...)
(व्होडाफोनची रमजान स्पेशल ऑफर, 5 रुपयात अनलिमिटेड डाटा)
(जिओची दिवाळी धमाका ऑफर; 500 रूपयात 100 जीबी ब्रॉडबँड डेटा)
 
प्राइम डे सेलमध्ये खास काय आहे....
- मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट आणि एक्सेसरीजवर मोठ्याप्रमाणात सवलत मिळणार, याशिवाय अनेक स्मार्टफोनचे यादरम्यान विशेष लॉन्चिग करण्यात येणार.
- प्राइम डे सेलच्यावेळी खरेदी करताना एचडीएफसी बॅंकच्या कार्डवर 15 टक्के कॅशबॅक मिळणार. 
- फिटबिट फिटनेस ट्रॅकर्सवर कमीत-कमी 40 टक्के सूट मिळणार आहे. 
- अॅमेझॉन पे वॉलेटचा वापर केल्यावर सुद्धा कॅशबॅक देण्यात येणार आहे.