Join us

सुधारणांबाबत कंपन्यांचा उत्साह थंडावला : फिक्की

By admin | Updated: August 23, 2015 22:15 IST

केंद्रातील मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनंतरही भारतीय कंपन्यांचा उत्साह सकारात्मक आहे. तथापि, गेल्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेची स्थिती

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनंतरही भारतीय कंपन्यांचा उत्साह सकारात्मक आहे. तथापि, गेल्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी उत्साहपूर्ण नाही. विशेषत: आर्थिक सुधारणांबाबत कंपन्यांची आशा मावळत चालली असल्याचे फिक्की अर्थात फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या अहवालात म्हटले आहे.अर्थव्यवस्थेतील सुधारणांची ही परिस्थिती गत सहा महिन्यांतील सर्वांत नीचांकी असल्याचे मत नोंदवून फिक्कीने म्हटले आहे की, एकूणच अर्थव्यवस्थेत आणि कंपनीस्तरावर फारशी समाधानकारक परिस्थिती नाही.