Join us  

चार दिवस बँका बंद, आजच करून घ्या महत्त्वाची कामं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 9:55 AM

अर्थक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी मार्च हा सगळ्यात खडतर महिना असतो.

मुंबईः आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता जेमतेम पंधरवडा उरलाय.  स्वाभाविकच, कर्ज परतफेड, विम्याचा हप्ता किंवा कराशी संबंधित काही कागदपत्रांसाठी तुम्हाला बँकेची मदत लागू शकते. ही कामं अजून झाली नसतील, तर अजिबात वेळ घालवू नका. कारण, २९ मार्च ते १ एप्रिल हे चार दिवस बँकांना सुट्या आहेत. त्यामुळे 'कल करे सो आज कर', हे वचन तात्काळ अंमलात आणा. 

२९ मार्चला महावीर जयंती, ३० मार्चला गुड फ्रायडे, ३१ मार्चला इअर एन्डिंग आणि १ एप्रिलला रविवार आहे. या सलग आलेल्या सुट्यांबाबत अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत आणि महत्त्वाची कामं २८ तारखेपर्यंत आटोपून घेण्यास सांगितलंय. 

अर्थक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी मार्च हा सगळ्यात खडतर महिना असतो. आर्थिक वर्षाचा लेखाजोखा, मांडताना, सगळे हिशेब जुळवताना त्यांची पार तारांबळ उडते. बँक कर्मचारी सध्या त्याच कामात व्यग्र आहेत. त्यात यंदा जीएसटीमुळे त्यांच्यावर अधिकच भार पडतोय. व्यापारी, उद्योजकांनी बँकांमध्ये रांगा लावल्यात. कराशी संबंधित कामं त्यांनाही ३१ मार्चआधी पूर्ण करायची असल्यानं तेही हातघाईवर आलेत. जीएसटीमुळे फायलिंगही नव्यानं करावं लागत असल्यानं सगळ्यांचाच गोंधळ उडालाय. 

या पार्श्वभूमीवर, बचत खातेदारांनी आपली कामं शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घेतलेली बरी. 

टॅग्स :बँकइन्कम टॅक्सजीएसटी