Join us

आॅनलाइन फेस्टिवल आॅफर्सची धूम! शॉपिंगसाठी ग्राहकांचा वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 05:38 IST

सध्या सर्वत्र आॅनलाइन शॉपिंगची धूम सुरू असून, ई कॉमर्स कंपन्यांच्या आॅफर्समुळे खरेदीने भलताच जोर धरला आहे. मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तु व कपडे, चपला, बुट यांपासून चॉकलेट्स व मिठाई व स्कूटर्स-बाइकपर्यंत सर्व वस्तू तिथे अतिशय स्वस्त असल्याने तिथे न वळणा-या ग्राहकांचा ओढा आॅनलाइन शॉपिंगकडे वाढत आहे.

मुंबई : सध्या सर्वत्र आॅनलाइन शॉपिंगची धूम सुरू असून, ई कॉमर्स कंपन्यांच्या आॅफर्समुळे खरेदीने भलताच जोर धरला आहे. मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तु व कपडे, चपला, बुट यांपासून चॉकलेट्स व मिठाई व स्कूटर्स-बाइकपर्यंत सर्व वस्तू तिथे अतिशय स्वस्त असल्याने तिथे न वळणा-या ग्राहकांचा ओढा आॅनलाइन शॉपिंगकडे वाढत आहे.सर्व ई कॉमर्स कंपन्यांचे सध्या सेल सुरू असून, काही वस्तू तर पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा कमी दराने उपलब्ध आहेत. या कंपन्यांनी दोन दिवसांपूर्वी सेल जाहीर केले आणि त्या पाहून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडत असतानाही अनेकांनी खरेदी सुरू केली. या कंपन्यांचे सेल उद्या, रविवारपर्यंत असून, शेवटच्या दिवशी तिथे झुंबडच उडेल, असे दिसते.या कंपन्या दिवाळीच्या आधी पुन्हा नव्या सवलती व सेलसह ग्राहकांसमोर येणार आहेत. त्यावेळी याच्या चौपट व्यवसाय होण्याचा दावा आहे. नवरात्रौत्सव झाल्यापासून तीन दिवसांत काही हजार कोटींची आॅनलाइन खरेदी झाल्याचे सांगण्यात येत आहे.- या फेस्टिवल आॅफर्सना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, यंदा या सर्व कंपन्यांनी आधीपासूनच अनेक कर्मचाºयांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली. अगदी गोदामांपासून, थेट वस्तू घरी पोहाचवण्यासाठी हजारो लोकांना नेमण्यात आले. त्यामुळे या आॅफर्सनी केवळ खरेदीच वाढली नसून, अनेकांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना, रोजगारही मिळाला आहे.