नवी दिल्ली : सरकारने व्यापार सुगमता वाढविल्याने आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याने सेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) एप्रिल ते डिसेंबर या अवधीत ८५.५ टक्क्यांनी वाढून ४.२५ अब्ज डॉलर झाली.औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी)च्या आकड्यांनुसार एप्रिल-डिसेंबर २०१४ या कालावधीत एफडीआय २.२९ अब्ज डॉलरचा मिळाला होता. सेवा क्षेत्रात बँकिंग, विमा, आऊटसोर्सिंग, कुरिअर, माहिती-तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. देशाच्या जीडीपीत सेवा क्षेत्राचे योगदान ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. देशात येणाऱ्या एकूण विदेशी गुंतवणुकीत या क्षेत्रातील एफडीआयचा वाटा १७ टक्के राहिला. एफपीआयमधील गुंतवणूकरिझर्व्ह बँकेद्वारे व्याजदर कपात केली जाण्याच्या शक्यतेने आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाने शेअर बाजारात गेल्या चार सत्रांत ४,१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक झाली.मात्र, याच काळात ७४६ कोटी रुपयेही काढून घेण्यात आले.खनिज तेलाचे घसरते भाव जागतिक मंदीमुळे चिंतित झालेल्या गुंतवणूकदारांनी (एफपीआय) गेल्या २ महिन्यांत १६,६४८ कोटी रुपये काढून घेतले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या चार व्यावसायिक सत्रांत ही गुंतवणूक वाढली आहे.
सेवा क्षेत्रातील एफडीआय ८५.५ टक्क्यांनी वाढला
By admin | Updated: March 7, 2016 02:55 IST