Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुकूल वातावरणाने सलग दुसरा सप्ताह तेजीचा

By admin | Updated: July 3, 2015 15:19 IST

पावसाचा अंदाज चुकीचा ठरत यंदा सर्वसामान्य पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून लवकरच व्याजदरात कपात केली जाण्याची अपेक्षा बाजाराला वाटत आहे.

प्रसाद गो. जोशीपावसाचा अंदाज चुकीचा ठरत यंदा सर्वसामान्य पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून लवकरच व्याजदरात कपात केली जाण्याची अपेक्षा बाजाराला वाटत आहे.या अपेक्षेसोबतच गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने सलग दुसऱ्या सप्ताहात निर्देशांकाने वाढ नोंदविली.मान्सूनचा पाऊस चांगला होण्याचा अंदाज आल्याने मुंबई शेअर बाजारामध्ये मागील सप्ताहात आलेला उत्साह गतसप्ताहातही कायम राहिलेला दिसून आला. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी बाजारावा चिंतेचे ढग जमले असले तरी संपूर्ण सप्ताहाचा विचार करता तेजी दिसून येते. सप्ताहात संवेदनशील निर्देशांक २७९६८ ते २७४१७ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २७८११.८४ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात १.८१ टक्के म्हणजे ४९५.६७ अंशांची वाढ झाली. दोन सप्ताहांमध्ये संवेदनशील निर्देशांकामध्ये १३६८.५४ अंश (५.२५ टक्के) वाढ झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ( निफ्टी) १५६.१५ अंश म्हणजेच १.९० टक्कयांनी वाढून ८३८१.१० अंशांवर बंद झाला.गुरुवार दि. २५ रोजी बाजारात जून महिन्याच्या व्यवहारांची सौदापूर्ती झाली. या सौदापूर्तीने सकारात्मक संदेश गेल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी होताना दिसून आली. परिणामी बाजार वाढला. पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा बाजाराला आहे. या अपेक्षेमुळेच बाजारामध्ये खरेदीची धूम असून मोठ्या प्रमाणावर खरेदीदार उपस्थित आहेत. याचाच पीरणाम निर्देशांकामध्ये चांगली वाढ होण्यात झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील उलाढाल वाढली मात्र मुंबई शेअर बाजारामधील उलाढाल घटली आहे.कर्जाच्या खाईत बुडालेल्या ग्रीसला आर्थिक पॅकेज देऊन या देशाला वाचविण्याचे जोरदार प्रयत्न युरोपियन युनियनकडून होत आहेत. शुक्रवारी या प्रयत्नांमध्ये काहीसा अडथळा आल्याने बाजारावर त्याचे नकारात्मक परिणाम झाले आणि बाजार काहीसा खाली आला. येत्या ३० तारखेपर्यंत ग्रीसला पॅकेज मंजूर होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास हा देश दिवाळखोरीमध्ये निघू शकेल आणि त्याचा मोठा फटका युरोपियन युनियनला बसणार असल्याने येथील देश त्यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रीसच्या या पॅकेजवर आता बाजाराचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सप्ताहाच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये बाजारातील उलाढाल घटलेली दिसून आली आहे.