Join us

शेअर बाजारात पाचव्या सत्रात तेजी

By admin | Updated: May 31, 2016 06:06 IST

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी सलग पाचव्या सत्रात तेजीत राहिला. ७२ अंकांनी वाढलेला सेन्सेक्स २६,७२६ अंकांवर बंद झाला. हा सात महिन्यांचा उच्चांक ठरला.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी सलग पाचव्या सत्रात तेजीत राहिला. ७२ अंकांनी वाढलेला सेन्सेक्स २६,७२६ अंकांवर बंद झाला. हा सात महिन्यांचा उच्चांक ठरला.मान्सूनबाबत सकारात्मक बातम्या आल्याचा लाभही बाजारांना मिळाला. याशिवाय विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी चांगली खरेदी केल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीनेच उघडला होता. त्यानंतर नफा वसुलीचे सत्र सुरू झाल्यामुळे त्यात थोडी घसरण झाली होती. तरीही सत्राच्या अखेरीस झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स २६,७२५.६0 अंकांवर बंद झाला. ७२ अंकांची अथवा 0.२७ टक्क्यांची वाढ त्याने मिळविली. २९ आॅक्टोबरनंतरचा हा सर्वोच्च बंद ठरला आहे. सेन्सेक्समधील टाटा मोटर्सचा समभाग सर्वाधिक वाढला. त्यापाठोपाठ कोल इंडियाचा समभाग वाढला. याशिवाय हीरो मोटोकॉर्प, टीसीएस, एनटीपीसी, डॉ. रेड्डीज, आयटीसी, बजाज आॅटो यांचे समभागही वाढले. भेलचा समभाग मात्र घसरला.