Join us

शेअर बाजारात तेजीचे रंग

By admin | Updated: March 3, 2015 23:59 IST

विदेशी संस्थांनी जोरदार खरेदी केल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी मंगळवारी जोरदार उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३५ अंकांनी वाढून २९,५९३.७३ अंकांवर बंद झाला.

मुंबई : विदेशी संस्थांनी जोरदार खरेदी केल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी मंगळवारी जोरदार उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३५ अंकांनी वाढून २९,५९३.७३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पहिल्यांदाच ९ हजार अंकांच्या वर चढला. आरआयएल, टीसीएस आणि सनफार्मा या कंपन्यांत जोरदार खरेदी दिसून आली. निफ्टी ९,00८.४0 अंकांवर पोहोचला होता. नंतर तो थोडासा खाली येऊन ८,९९६.२५ अंकांवर बंद झाला. हा निफ्टीचा सार्वकालिक विक्रम आहे. ३९.५0 अंकांची अथवा 0४४ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. या आधी ३0 जानेवारी रोजी तो ८,९९६.६0 अंकांपर्यंत वर चढला होता. काल तो ८,९५६.७५ अंकांवर बंद झाला होता. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २९,५00 अंकांवर तेजीने उघडला. त्यानंतर तो आणखी वर चढून २९,६३६.८६ अंकांवर गेला. सत्र अखेरीस २९,५९३.७३ अंकांवर बंद झाला. १३४.५९ अंकांची अथवा 0.४६ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. तत्पूर्वी, काल विदेशी संस्थांनी ४२४.७९ कोटी रुपयाची समभाग खरेदी केली.आशियाई बाजारात नरमाईचा कल दिसून आला. दक्षिण कोरियाचा कोसपी निर्देशांक मात्र पाच महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. युरोपीय बाजारात मात्र सकाळच्या सत्रात तेजीचे वातावरण दिसूनआले. बाजाराची एकूण व्याप्ती तेजीची राहिली. १,६७७ कंपन्यांचे समभाग वर चढले. १,१७६ कंपन्यांचे समभाग घसरले. १४३ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल घटून ४,२२४.0६ कोटी झाली. काल ती ४,६४७.९३ कोटी होती. ४तेजीचा लाभ झालेल्या सेन्सेक्समधील बड्या कंपन्यांत आरआयएल, टीसीएस, बजाज आॅटो, सिप्ला, सन फार्मा, सेसा स्टरलाईट, टाटा पॉवर, विप्रो आणि हिंदाल्को यांचा समावेश आहे. घसरण सोसावी लागलेल्या कंपन्यांत एमअँडएम, अ‍ॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, एनटीपीसी यांचा समावेश आहे.