शोभेल अशीच फॅशन करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 16:06 IST
या काही टिप्सनी तुमचा फॅशन सेन्स पूर्णपणे बदलून जाईल.
शोभेल अशीच फॅशन करा
फॅशनच्या बाबतीत सतत कोणी ना कोणी काही ना काही सांगत असते. सगळ्यांच्या टिप्स ऐकल्या, तर कुठल्यातरी एखाद्या फॅशन ट्रेंडवर कॉन्सनट्रेट करणे फार अवघड असते. यामुळे तुम्ही कोणता ट्रेंड फॉलो करायचा किंवा स्वत:ची स्टाईल कशी तयार करता येईल, याचा विचार केला पाहिजे. या काही टिप्सनी तुमचा फॅशन सेन्स पूर्णपणे बदलून जाईल.► तुमच्या साईजनुसार कपडे परिधान करा. तुम्ही वेंधळे दिसू नये असे वाटत असेल, तर खूप टाईट किंवा खूप सैल कपडे घालणे टाळा.► वाढलेला पोटाचा घेर तुमच्या चिंतेचे कारण बनला असेल, तर पेप्लम्स (कंबरेच्या वर फ्रॉकसारखी शिवण असलेला ड्रेस) परिधान करा.► तुम्हाला कोणता कलर सूट होतो, हे माहिती करून घ्या. तुमच्या त्वचेच्या रंगांवर कपड्यांचा योग्य रंग अवलंबून असतो, यामुळे तुमचा स्किन अंडरटोन लक्षात घ्या. ► तुमचे फॅशन फंडे गुपीत ठेवा. तसेच कपड्यांचे रंग, त्यानुसार वापरता येणारे दागिने एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा.► ट्युब टॉप घालणे अतिशय धोकादायक असते आणि तुम्हाला निश्चित तुमचे हसू करून घ्यायचे नसेल. त्यामुळे असे टॉप घालणे शक्यतो टाळा