Join us

शेतकरी महिलांसाठी ‘सफल’ची योजना

By admin | Updated: March 11, 2016 03:28 IST

कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा करण्यात अग्रेसर असलेल्या सस्टेनेबल अ‍ॅग्रो (सफल) कंपनीने शेतकरी महिलांसाठी एका अनोख्या योजनेची घोषणा केली आहे

मुंबई : कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा करण्यात अग्रेसर असलेल्या सस्टेनेबल अ‍ॅग्रो (सफल) कंपनीने शेतकरी महिलांसाठी एका अनोख्या योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील शेतकरी महिलांना पाच हजार रुपयांपपर्यंत व्याजमुक्त विशेष वित्तपुरवठा केला जाणार आहे.कोणत्याही तारणाशिवाय हा वित्तपुरवठा होणार असून, पाच हजार ते ५० हजार, असे तीन टप्पे निश्चित केले असून, यामध्ये सरळव्याज पद्धतीने व्याजाची आकारणी होईल.पाच ते पंधरा हजारांसाठी ५ टक्के व्याज, १५ ते २५ हजारांसाठी ६ टक्के व्याज, तर २५ ते ५० हजारांसाठी ७ टक्के व्याज आकारणी होईल. शेतकरी महिलांचा शाश्वत विकास करणे आणि त्यांच्या स्वप्नांना वित्तीय बळ देणे या उद्दिष्टाने आम्ही ही योजना राबवीत असल्याची प्रतिक्रिया सफलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सोनमाळे यांनी दिली. (प्रतिनिधी)