नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोने चांदीच्या किंमती उतरल्यामुळे ,तसेच दागिने व किरकोळ ग्राहकांची मागणी कमी झाल्यामुळे सराफा बाजारातील सोन्याचे भाव ५० रुपयाने खाली उतरले. राजधानीत सोने आज १० ग्रॅममागे २६.४५० रुपयाला विकले गेले. आद्योगिक बाजारही मंदावल्यामुळे चांदीचे भावही ४०० रुपयाने कमी झाले असून, दर किलोमागे ३७,६०० रुपये प्रती किलो दराने चांदीची विक्री झाली. सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव औसामागे ११८२.३० डॉलर राहिला व चांदीचा भाव ०.२१ टक्के कोसळून औसामागे १६.६९ डॉलर राहिला. दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध सोने १० ग्रँममागे २६,४५० व ९९.५० टक्के स्टँडर्ड सोने २६.३०० रुपये अशाी विक्री झाली. चांदीच्या नाण्यांचे भाव १००० रुपयाने उतरुन ५५ हजार ते ५६ हजार प्रती शेकडा राहिले.
सोने व चांदीच्या किंमतीत घसरण
By admin | Updated: March 23, 2015 23:46 IST