नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सराफ्यात बुधवारच्या तेजीनंतर आज मागणी कमी झाल्याने घसरणीचा कल नोंदला गेला आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव १२० रुपयांच्या घसरणीसह २८,३०० रुपये प्रति १० ग्रॅम व चांदीचा भावही ४२० रुपयांनी घटून ३९,१०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाल्याने मौल्यवान धातूंच्या मागणीत घट राहिली. परिणामी, स्थानिक सराफ्यात ज्वेलर्स व रिटेलर्स यांच्या मागणीत घसरण नोंदली गेली. जागतिक घसरणीचा स्थानिक बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाला.देशी बाजाराचा कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.५ टक्क्याने घसरून १,२७८.२७ डॉलर व चांदी ०.९ टक्क्याने घटून १७.८४ डॉलर प्रतिऔंस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने-चांदीच्या भावात घसरण
By admin | Updated: January 29, 2015 23:50 IST