नवी दिल्ली : सराफा बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात किरकोळ घट झाली. सोने १४० रुपयांनी घसरून २६,७०० रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदी ५० रुपयांनी घसरून प्रति किलो ३५,२०० इतकी झाली.डॉलरच्या तुलनेत आज रुपयात सुधारणा झाल्याने आयात काही प्रमाणात स्वस्त झाली, त्यामुळे सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लंडनमध्ये आज सोने ०.३० टक्क्यांनी घसरून १११९.४० डॉलर प्रति औंस झाले, तर चांदी ०.०३ टक्क्यांनी घसरून १४.५७ डॉलर प्रति औंस इतकी झाली.राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत १४० रुपयांची घट झाली. ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत १४० रुपयांनी कमी झाली. ती अनुक्रमे २६,७०० रुपये आणि २६,५५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या वाढ झाली होती; मात्र आज दुसऱ्याच दिवशी घसरण झाली.
सोन्या-चांदीच्या भावात झाली घसरण
By admin | Updated: September 9, 2015 03:44 IST