Join us

सेन्सेक्समध्ये सलग पाचव्या सत्रात घसरण

By admin | Updated: July 15, 2014 02:16 IST

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी सलग पाचव्या व्यावसायिक सत्रात कोसळला. सेन्सेक्स १७ अंकांनी खाली येऊन २५,००६.९८ अंकांवर बंद झाला

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी सलग पाचव्या व्यावसायिक सत्रात कोसळला. सेन्सेक्स १७ अंकांनी खाली येऊन २५,००६.९८ अंकांवर बंद झाला. टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये नफेखोरी झाल्याने बाजारात नरमीचा कल राहिला, असे जाणकारांनी सांगितले.बीएसईचा ३० शेअर आधारित सेन्सेक्स सकाळी २५,०९३.१६ अंकांवर उघडला. ठोक किंमत निर्देशांकावरील महागाईची आकडेवारी आल्यानंतर प्रारंभिक व्यवहारात तो २५,०९५.७६ अंकांपर्यंत झेपावला होता. मात्र, काही निवडक शेअरमध्ये नफेखोरी झाल्याने हा २४,८९२.०० अंकांपर्यंत खाली आला. शेवटी १७.३७ अंकाच्या घसरणीसह तो २५,००६.९८ अंकांवर बंद झाला.सेन्सेक्स गेल्या पाच सत्रांत १०९३ अंकाहून अधिकने खाली आला आहे.नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ५.४५ अंकांनी घसरून ७४५४.१५ अंकांवर बंद झाला.रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर ०.५३ टक्क्यांनी खाली येऊन ९६१.८५ रुपयांवर आले. सरकारने निर्धारित लक्ष्यापेक्षा कमी गॅस उत्पादन केल्याप्रकरणी कंपनीवर ५७.९ कोटी डॉलर दंड लावला आहे. विक्रीमुळे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी याचे शेअर घसरले. तसेच विप्रो, सेसा स्टरलाईट, एनटीपीसी, भारती एअरटेल तथा कोल इंडिया यांच्या शेअरमध्येही घसरण नोंदली गेली.दुसरीकडे मागणी वाढल्याने हिंदाल्को, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक, ओएनजीसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, भेल, हीरो मोटोकार्प तथा टीसीएस यांचे शेअर लाभासह बंद झाले. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर बाजाराला उतरती कळा लागली आहे. अर्थसंकल्पात अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत. (प्रतिनिधी)