Join us

सराफा बाजारात घसरण

By admin | Updated: December 24, 2014 00:08 IST

जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात घसरणीचा कल राहिला. सोन्याचा भाव

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात घसरणीचा कल राहिला. सोन्याचा भाव मागणीअभावी २६५ रुपयांनी कोसळून २७,००० रुपये प्रतितोळा झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांची मागणी घटल्याने चांदीचा भाव ५५० रुपयांच्या घसरणीसह ३६,३५० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिल्याने आभूषण निर्माते व किरकोळ विक्रेते यांच्या मागणीत घट झाली. भाव दोन आठवड्यांच्या नीचांकावर पोहोचला. याचा स्थानिक बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाला. दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २६५ रुपयांनी कोसळून अनुक्रमे २७,००० रुपये व २६,८०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर स्थिर राहिला. तयार चांदीचा भाव ५५० रुपयांनी घटून ३६,३५० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ६०५ रुपयांनी कमी होऊन ३६,३२० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५९,००० रुपये व विक्रीकरिता ६०,००० रुपये प्रतिशेकडा राहिला.