नवी दिल्ली : दागिने निर्मात्यांकडून नसलेली मागणी आणि जागतिक बाजारातील सुस्तीमुळे सोमवारी येथील सराफा बाजारात सोने १० ग्रॅममागे १० रुपयांनी खाली येऊन २६,८१० रुपये झाले. औद्योगिक क्षेत्रातून आणि नाणी निर्मात्यांकडून मागणी नसल्यामुळे चांदी किलोमागे २७० रुपयांनी स्वस्त होऊन ३६,५०० रुपयांवर आली.बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात व्याजदरात वाढ करण्याचे अंदाज व्यक्त होत असल्यामुळे गुंतवणुकीसाठी म्हणून सोने व चांदीची मागणी कमी झाली व पर्यायाने सोने चार आठवड्यांपूर्वीच्या किमतीवर पोहोचले.
सराफा बाजारात घसरण
By admin | Updated: November 3, 2015 02:24 IST