Join us  

व्यवसायिक क्षेत्रात जाणाऱ्या निधीत ८८ टक्क्यांची घट, आर्थिक मंदीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 5:22 AM

रिझर्व्ह बँकेनेच ही माहिती दिली असल्याने त्याचा प्रतिवाद करणेही केंद्र सरकारला शक्य होणार नाही.

नवी दिल्ली : देशामध्ये आर्थिक मंदी नाही, असे केंद्र सरकार सातत्याने सांगत असले, तरी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीमुळे देशात मंदीची लक्षणे दिसू लागली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या माहितनुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये व्यवसायिक क्षेत्रातील वित्तीय देवाणघेवाणीमध्ये तब्बल ८८ टक्के घट झाली आहे.रिझर्व्ह बँकेनेच ही माहिती दिली असल्याने त्याचा प्रतिवाद करणेही केंद्र सरकारला शक्य होणार नाही. बँकेच्या आकडेवारीप्रमाणे या आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये नॉन बँकिंग क्षेत्रातून व्यवसायिक क्षेत्रात केवळ ९0 हजार ९९५ कोटी रुपयेच गेले. गेल्या वर्षी याच सहा महिन्यांच्या काळात व्यवसायिक क्षेत्रात नॉन बँकिंग क्षेत्रातून ७ लाख ३६ हजार कोटी रुपये इतकी रक्कम गेली होती.व्यवसायिक क्षेत्रात जाणारा निधी कमी होणे याचाच अर्थ व्यवसाय व उद्योग सध्या अडचणीत आहेत. बाजारात मागणी नसल्याने, वस्तूंना उठाव नसल्याने उत्पादनही कमी आहे. त्यामुळेच नॉन बँकिंगकडून व्यवसायिक क्षेत्रातकडे जाणारी रक्कम कमी आहे. म्हणजेच व्यवसायिक क्षेत्र सध्या निधीची मागणी करताना दिसत नाही, असे कळते.मागणी, उत्पादन नसल्याने कामगार कपातदेशाच्या अर्थव्यवस्थेत गेल्या तिमाहीपासूनच मोठी घसरण दिसू लागली आहे. मागणी नाही, त्यामुळे उत्पादन नाही, ते नसल्याने कामगार कपात असे दुष्टचक्र दिसत आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत आर्थिक विकासाचा दर ५ टक्क्यांच्याही खाली गेला.सहा वर्षांतील ही सर्वात वाईट स्थिती होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने २0१९-२0 साठी देशाचा जीडीपी दर ६.९ टक्क्यांवरून ६.१ टक्क्यांवर आणला आहे.

टॅग्स :व्यवसाय