Join us

सरकारी बँकांतून पैसे काढताना, भरताना अधिकचं शुल्क मोजावं लागणार?; जाणून घ्या सत्य

By कुणाल गवाणकर | Updated: November 3, 2020 18:02 IST

आता बँकेत पैसे भरताना आणि बँकेतून पैसे काढताना शुल्क आकारलं जाण्याच्या चर्चेवर सरकारचं स्पष्टीकरण

मुंबई: सरकारी बँकांमध्ये पैसे भरताना आणि काढताना मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्यात येणार असल्याच्या वृत्ताची बरीच चर्चा आहे. बँकेत आपलेच पैस भरणं आणि खात्यातून आपलेच पैसे काढणं आता खर्चिक होणार असल्याची, सरकार सर्वसामान्यांच्याच खिशात हात घालत असल्याची चर्चा यामुळे सुरू आहे. त्यावरून आता अर्थ मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. जन धन खात्यांसह बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खातेधारकांकडून बँका कोणतंही शुल्क आकारणार नाहीत. बीएसबीडी खात्यांची संख्या ६०.०४ कोटी इतकी आहे. यामध्ये ४१.१३ कोटी जन धन खाती आहेत. या खातेधारकांकडून बँकांनी शुल्क आकारू नये, अशा सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिल्या आहेत.ICICI, AXIS बँकेचा ग्राहकांना झटका; संध्याकाळी ६ ते सकाळी ८ अन् सुट्टीच्या दिवशी ATM वापराल तर...नियमित बचत खाती, चालू खाती, कॅश क्रेडिट खाती आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांसाठी असलेलं शुल्क वाढवण्यात आलेलं नसल्याचं अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे. केवळ बँक ऑफ बडोदाने १ नोव्हेंबरपासून काही शुल्कांमध्ये वाढ केली आहे. बँकेनं निशुल्कपणे पैसे जमा करण्याची आणि काढण्याची मर्यादा कमी करण्यात आली आहे. याआधी महिन्यातून पाच वेळा निशुल्क उपलब्ध असलेली ही सेवा आता केवळ तीनवेळाच निशुल्क उपलब्ध असेल, असं बँकेनं म्हटलं होतं. मात्र कोरोनाचं संकट असल्यानं बँकेनं हा निर्णय मागे घेतला आहे. इतर कोणत्याही सरकारी बँकांनी शुल्कात वाढ केलेली नाही.आरबीआयनं सर्व बँकांना योग्य शुल्क पारदर्शकपणे आकारण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. मात्र सध्या कोरोनाचं संकट नसल्यानं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका शुल्कात कोणतीही वाढ करण्याच्या विचारात नाहीत.

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्रभारतीय रिझर्व्ह बँक