Join us

फेसबुर मॅसेंजर अॅपने गाठला ८० कोटींचा टप्पा

By admin | Updated: January 8, 2016 17:34 IST

सोशल नेटवर्किंगच्या जगात लोकप्रिय असलेल्या फेसबुक मॅसेंजर अॅपने २०१५ मध्ये ८०० दशलक्षचा टप्पा पार केला आहे. ग्लोबल रिसर्च फर्म निल्सेनने केलेल्या सर्वेक्षणानुसार, फेसबुक

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - सोशल नेटवर्किंगच्या जगात लोकप्रिय असलेल्या फेसबुक मॅसेंजर अॅपने २०१५ मध्ये ८० कोटींचा टप्पा पार केला आहे. ग्लोबल रिसर्च फर्म निल्सेनने केलेल्या सर्वेक्षणानुसार, फेसबुक सोशल नेटवर्किंगमध्ये टॉपला असलेल्या फेसबुक स्मार्टफोन मॅसेंजर अॅपचे गेल्या वर्षात प्रत्येक महिन्याला १२ कोटींपेक्षा जास्त युनिक युजर्स होते.
२०१४ मध्ये फेसबुक मॅसेंजर अॅपने ५५ कोटी युजर्सचा टप्पा गाठला होता.त्यानंतर आता गेल्या वर्षात म्हणजेच २०१५ मध्ये ८० कोटींच्यावर युजर्संचा टप्पा गाठला आहे. जगभरातील लोकांना संवाद साधण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी चांगली सेवा देण्याचे काम फेसबुक मॅसेंजरची टीम काम करत आहे. फेसबुकने २०११ मध्ये मॅसेंजर अॅप्स विकसित केले आणि त्यानंतर स्मार्टफोनच्या माध्यमातून हे अॅप्स डाऊनलोड केल्यानंतर लोकांनी आपले खासगी मॅजेस पाठविण्याची सेवा उपलब्ध करु दिली.