Join us

एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले; स्टेट बँकेचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:50 IST

२०१७-१८ आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या अर्ध वर्षात एटीएममधून पैसे काढण्याचा वेग १२.२ टक्क्यांनी वाढला असून, हे प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक आहे.

मुंबई : २०१७-१८ आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या अर्ध वर्षात एटीएममधून पैसे काढण्याचा वेग १२.२ टक्क्यांनी वाढला असून, हे प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक आहे.देशभरात सध्या चलन तुटवड्याची स्थिती आहे. याचे नेमके कारण कोणत्याच यंत्रणेला माहीत नसले, तरी एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढल्याचे स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने म्हटले आहे, पण हे का वाढले, याचे उत्तर स्टेट बँकेकडेही नाही. आॅक्टोबर ते एप्रिल हा काळ सहसा दसरा, दिवाळी, नाताळ या सणांसह कृषी उत्पादनांच्या कापणीचा असतो. या काळात खरेदी वाढल्याने एटीएममधील पैसे काढण्याचा वेग आर्थिक वर्षाच्या पहिल्या अर्ध वर्षाच्या तुलनेत अधिक असतो, पण २०१७-१८ या आर्थिक वर्षात तो सरासरीपेक्षाही जास्त राहिला. २०१२-२०१७ दरम्यान दुसºया अर्ध वर्षात एटीएम विथड्रॉवल सरासरी ८.२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. मागील आर्थिक वर्षात त्याहून अधिक वेगाने खातेदारांनी एटीएमद्वारे पैसे काढून घेतले. ही वाढ नेमकी का झाली, हे अद्यापही स्पष्ट होणारे नाही, असे बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्या कांती घोष यांचे म्हणणे आहे.२४ तासांत पुरवठा वाढविला‘स्टेट बँकेने २४ तासांत सर्व एटीएममधील रोख पुरवठा वाढविला आहे. ठरावीक भौगोलिक क्षेत्रातील एटीएममध्ये समस्या दिसून येत आहे. तेथे स्थिती सामान्य आणण्यासाठी विशेष प्रयत्न बँकेने सुरू केले आहेत.’- नीरज व्यास, मुख्य परिचालन अधिकारी, स्टेट बँक आॅफ इंडिया

टॅग्स :एटीएम