नवी दिल्ली : टोरेंट फार्मास्युटिकल्स आणि काकिनाडा सेझसह जवळपास ३१ विशेष आर्थिक क्षेत्र डेव्हलपर्स आणि संस्थांना त्यांच्या प्रकल्पांना सुरू करण्यासाठी सरकारने डिसेंबर २०१५ पर्यंतचा वेळ दिला आहे. हा निर्णय वाणिज्य सचिव राजीव खेर यांच्या अध्यक्षतेखालील मंजुरी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हे मंडळ १९ सदस्यांची आंतरमंत्रालयीन यंत्रणा असून सेझशी (विशेष आर्थिक क्षेत्र) संबंधित प्रश्नांवर विचार करते. ज्यांनी ज्यांनी मुदत वाढवून दिली होती त्या सगळ्यांना एक वर्षाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. ज्यांना मुदत वाढवून देण्यात आली आहे त्यात स्मार्ट सिटी कोच्ची, इन्फ्रास्ट्रक्चर, सराफ एजन्सीज आणि गोल्डन टॉवर इन्फ्राटेकचा समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
३१ सेझ प्रकल्पांना मिळाली मुदतवाढ
By admin | Updated: March 9, 2015 23:51 IST