Join us

निर्यात दुप्पट करणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 04:35 IST

राज्यातील निर्यात तीन वर्षांत दुप्पट करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये लघु व मध्यम उद्योगांचा सहभाग आवश्यक व महत्त्वाचा असेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

मुंबई : राज्यातील निर्यात तीन वर्षांत दुप्पट करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये लघु व मध्यम उद्योगांचा सहभाग आवश्यक व महत्त्वाचा असेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.भारतीय उद्योग महासंघातर्फे झालेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकतेबाबत (एएमएसएमई) परिषदेत देसाई यांनी उद्योग विभागाच्या योजनांवर प्रकाश टाकला. देशाच्या निर्यातीत ४० टक्के वाटा एमएसएमईचा आहे. महाराष्ट्रानेही या क्षेत्राला बळ देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी प्रत्येक औद्योगिक वसाहतीतील २० टक्के क्षेत्र एमएसएमईसाठी राखीव ठेवले जाईल. तात्काळ उत्पादन सुरू करणाºया कंपन्यांना त्याचे वाटप केले जाईल. सुमारे ७० टक्के एमएसएमई पहिल्या वर्षानंतर संकटात येत असून,त्यासाठी सिडबीचे सहकार्य घेतले जात आहे, असे ते म्हणाले. लष्कराच्या सीएसडी कॅन्टीनच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एअरमार्शल एम. बालदित्य, सीआयआयचे महाराष्टÑ परिषद अध्यक्ष ऋषी बागला, के. नंदकुमार यावेळी उपस्थित होते.राज्यात ३५ लाख छोटे कारखाने नोंदणीकृत आहेत. कारखान्यांची प्रत्यक्ष संख्या त्याहून अधिक आहे. त्यांच्या नोंदणीसाठी सीआयआयने सहकार्य करण्याचे आवाहन उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी केले. सध्या ६ कोटी एमएसएमई आहेत. त्यापेक्षा मोठा ७ कोटी आकडा नॅनो उद्योजकांचा आहे, असे मत डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :सुभाष देसाई