Join us  

दुचाकींची निर्यात पुढच्या वर्षी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 2:28 AM

कोरोना महासाथ आणि कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात दुचाकी निर्यातीत घट झाली आहे. हीच परिस्थिती यंदाच्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत कायम राहील

नवी दिल्ली : कोरोना महासाथीमुळे जगभरातच मंदीचे वातावरण निर्माण झाले असल्याने दुचाकींच्या निर्यातीतही कमालीची घट झाली आहे. मात्र, पुढील आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात ही कसर भरून निघेल आणि निर्यातीत वाढ होईल, असा आशावाद इंड-आरए या मानांकन संस्थेने व्यक्त केला आहे. 

कोरोना महासाथ आणि कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात दुचाकी निर्यातीत घट झाली आहे. हीच परिस्थिती यंदाच्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत कायम राहील आणि साधारणपणे पुढील आर्थिक वर्षाच्या (२०२१-२२) उत्तरार्धात दुचाकी निर्यात वेग घेईल, असे इंड-आरए या संस्थेने अहवालात नमूद केले आहे. आफ्रिकी, आशियाई आणि लॅटिन अमेरिकी देशांत दुचाकी निर्यात केल्या जातात. यंदा निर्यात अनुक्रमे ३७.५, २२.९ आणि २१.४ टक्के एवढी राहिली. नेहमीपेक्षा ही निर्यात कमी आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण दुचाकींपैकी निम्म्या दुचाकी नायजेरिया, कोलम्बिया, नेपाळ, बांगलादेश आणि फिलिपाइन्स या देशांत होते. 

टॅग्स :बाईकव्यवसाय