Join us

संरक्षणावर 9 टक्के किंवा 2.68 लाख कोटींच्या वाढीव खर्चाची अपेक्षा

By admin | Updated: February 24, 2016 18:11 IST

भारताच्या संरक्षण खात्याच्या बजेटमध्ये किरकोळ म्हणजे 9 टक्क्यांची किंवा 2.68 लाख कोटी रुपयांची वाढ होईल अशी अपेक्षा आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - भारताच्या संरक्षण खात्याच्या बजेटमध्ये किरकोळ म्हणजे 9 टक्क्यांची किंवा 2.68 लाख कोटी रुपयांची वाढ होईल अशी अपेक्षा आहे. त्याखेरीज संरक्षण खात्याचे केवळ पेन्शन बिलच 80 हजार कोटी रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साधारणपणे 3.1 लाख कोटी रुपयांचा जास्त खर्च बजेटमध्ये प्रस्तावित करण्यात येईल असा अंदाज व्यक्त होत आहे.
वन रँक वन पेन्शनच्या अमलबजावणीमुळे पुडील आर्थिक वर्षात पेन्शनचा मोठा बोजा पडणार असल्याचे उघड आहे. गेल्या वर्षी 77 हजार कोटी रुपये विविध शस्त्रसामग्रीच्या खरेदीसाठी निश्चित करण्यात आले होते. परंतु हे सगळे पैसे खर्च झाले नसून जवळपास 16 टक्के रक्कम शिल्लक आहे, जी परत करण्यात येईल.
शस्त्रसामग्री मुदतीमध्ये खरेदी न होणे, त्यामध्ये विलंब होणे असे अनेक प्रकार घडले असून आता सरकार शस्त्रखरेदीमध्ये सुधारणा आणत असून त्या संदर्भातही बजेटमध्ये घोषणा होणे अपेक्षित आहे.