Join us  

एक्झिट पोलमुळे मिळाली शेअर बाजाराला उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:06 AM

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाटण्यासारखी परिस्थिती असल्याने सप्ताहाच्या पूर्वार्धात बाजारात काहीशी निराशा होती. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या निकालांनी बाजाराचा नूर पालटला. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला सत्ता मिळण्याचा अंदाज असल्याने बाजार उसळला.

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाटण्यासारखी परिस्थिती असल्याने सप्ताहाच्या पूर्वार्धात बाजारात काहीशी निराशा होती. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या निकालांनी बाजाराचा नूर पालटला. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला सत्ता मिळण्याचा अंदाज असल्याने बाजार उसळला.सप्ताहाचा प्रारंभ तेजीने करणाºया बाजाराला नंतरच्या काळात मात्र विक्रीमुळे घसरण अनुभवावी लागली. सप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेले एक्झिट पोलचे निकाल आणि जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले सकारात्मक वातावरण, यामुळे सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये शेअर बाजारात चांगली खरेदी झाली.मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाचा विचार करता, तो सप्ताहाच्या प्रारंभी वाढीव पातळीवर (३३३१७.७२) खुला झाला. सप्ताहामध्ये त्याने ३३६२१.९६ अंश ते ३२८८६.९३ अंशांदरम्यान हिंदोळा घेतला. सप्ताहाच्या अखेरीस तो ३३४६२.९७ अंशांवर बंद झाला. गतसप्ताहाच्या बंद निर्देशांकाशी तुलना करता, त्यामध्ये २१२.६७ अंशांची वाढ झाली. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी ) सुमारे २ टक्के म्हणजे ६१ अंशांनी वाढून १०३२६.६५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांक अनुक्रमे ६९.६४ आणि ४१.२३ अंशांनी खाली आले.भारतातील घसरलेले औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीच्या दराने गाठलेला १५ महिन्यांतील उच्चांक यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्याच्याच जोडीला राज्यांना जीएसटीमुळे होणाºया तोट्यात मोठी वाढ होण्याचे सुतोवाच केले. यामुळे अर्थव्यवस्थेबाबत चिंतेचे वातावरण होते. मात्र, एक्झिट पोलच्या निकालांनी बाजारात तेजी परतली.दरम्यान, अमेरिकेने व्याजदरांमध्ये पाव टक्का वाढ केल्याची केलेली घोषणा आणि युरोपच्या अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी यामुळे तेथील बाजार तेजीत राहिले.मुंबई शेअर बाजार निर्देशांकांमध्ये आजपासून बदल-मुंबई शेअर बाजाराने आपल्या विविध निर्देशांकांमधील घटकांमध्ये सोमवार दि. १८ डिसेंबरपासून काही बदल करण्याचे जाहीर केले आहे. काही निर्देशांकांमध्ये काही आस्थापनांच्या जागी नवीन आस्थापनांचा समावेश होणार आहे. बीएसई १०० ईएसजी या निर्देशांकामधून मात्र कॅनरा बॅँक आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या दोन आस्थापनांना अर्धचंद्र मिळणार आहे.३० आस्थापनांच्या संवेदनशील निर्देशांकामधून सिप्ला आणि ल्युपिन या आस्थापनांच्या जागेवर इंडसइंड बॅँक आणि येस बॅँकेचे समावेश केला जाणार आहे. अन्य आस्थापना जैसे थे असतील.याशिवाय बीएसई १००, बीएसई सेन्सेक्स ५०, बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ५०, बीएसई२००, बीएसई५००, बीएसई टेक, बीएसई कार्बाेनेक्स या निर्देशांकांच्या घटकांमध्येही बदल केले जाणार आहेत. चांगली कामगिरी असणाºया आस्थापनांचा निर्देशांकांमध्ये समावेश होणार आहे.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकगुजरात निवडणूक 2017