Join us
Daily Top 2Weekly Top 5

खनिज तेल ४ वर्षे स्वस्त राहण्याचा अंदाज

By admin | Updated: December 25, 2015 01:28 IST

खनिज तेलाच्या जागतिक बाजारात हळूहळू सुधारणा होईल आणि चार वर्षांनंतर त्याचे दर ७० डॉलर प्रति बॅरलच्या वर जाऊ शकतील, असे ‘ओपेक’

व्हिएन्ना : खनिज तेलाच्या जागतिक बाजारात हळूहळू सुधारणा होईल आणि चार वर्षांनंतर त्याचे दर ७० डॉलर प्रति बॅरलच्या वर जाऊ शकतील, असे ‘ओपेक’ या तेल उत्पादक संघटनेच्या एका अहवालात म्हटले आहे.गेल्या सोमवारी खनिज तेलाचे दर ११ वर्षांतील किमान स्तरावर येऊन ३६.०४ डॉलर प्रति बॅरल झाले होते. या पार्श्वभूमीवर ‘ओपेक’चा हा अंदाज आला आहे. हळूहळू वाढती मागणी, गैर ओपेक देशातून कमी पुरवठा, सध्या असलेल्या आवश्यकतेपेक्षा जास्त पुरवठा ही स्थिती बदलेल आणि बाजार संतुलित होईल. २०२० पर्यंत खनिज तेलाचे दर ७०.७० डॉलर प्रति बॅरल आणि २०४० पर्यंत ९५ डॉलर प्रति बॅरल राहण्याच्या अंदाजावर ‘ओपेक’ने आपला अहवाल तयार केला आहे. या अहवालात गेल्या वर्षीच्या अहवालात नोंदविण्यात आलेल्या अंदाजापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षीच्या अंदाजात या दशकात उर्वरित वर्षात तेलाचे भाव ११० डॉलर प्रतिबॅरल राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.