नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने मोठ्या कंपन्या व त्यांच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी विशेष कॉर्पोरेट कार्यालय (एससीओ) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित कार्यालयांतील कामकाज कागदरहित म्हणजेच अधिकाधिक काम संगणकीकृत असणार आहे.ईपीएफओच्या मुंबईतील बांद्रा कार्यालयात अशा प्रकारचे पहिले एससीओ उघडले जाणार आहे. बांद्रा येथील प्रस्तावित एससीओचे कामकाज येत्या १ नोव्हेंबर रोजी सुरू होईल. ईपीएफओच्या आदेशानुसार, या एससीओंची स्थापना ‘पेपरलेस’ कार्यालयाच्या धर्तीवर मोठ्या कंपन्या, संस्था यांच्यासाठी असणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात एससीओची स्थापना होईल. देशभरात ईपीएफओचे १२० हून अधिक फिल्ड आॅफिस आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}