नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना चालू आर्थिक वर्षासाठी (२०१५-१६) व्याजदरात थोडी वाढ करण्याची शक्यता आहे. उद्या, बुधवारी कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या (ईपीएफओ) विश्वस्त मंडळाची बैठक होणार असून, यात हा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.सध्या भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदर ८.७५ टक्के आहे. ईपीएफओच्या फेररचनेच्या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा करण्यासाठी ईपीएफ विश्वस्त मंडळाची उद्या, बुधवारी बैठक बोलावण्यात आली आहे. ईपीएफओने चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाबाबत अंदाज लावण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. त्यामुळे या बैठकीत व्याजदर निश्चित केले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ईपीएफ व्याजदर वाढणार?
By admin | Updated: December 8, 2015 23:42 IST