Join us

पर्यावरणप्रेमी रेल्वे अर्थसंकल्प!

By admin | Updated: February 25, 2015 00:21 IST

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये म्हणजे सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे, टाकाऊ पदार्थांतून ऊर्जानिर्मिती आणि रेल्वेच्या प्रवासासाठी सीएनजीचा वापर वाढविणे असू शकतील.

नवी दिल्ली : यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये म्हणजे सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे, टाकाऊ पदार्थांतून ऊर्जानिर्मिती आणि रेल्वेच्या प्रवासासाठी सीएनजीचा वापर वाढविणे असू शकतील. २६ फेब्रुवारी रोजी लोकसभेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू अर्थसंकल्प मांडतील, त्यात जलसंधारणावर मोठा भर असेल.सौर ऊर्जेच्या वापरासह डबे, स्टेशन इमारती आणि प्लॅटफॉर्मस् स्वच्छ व चकचकीत करणे, पाण्याच्या फेरवापरासाठी यंत्रणा उभारणे, उत्पादनासाठी व वर्कशॉप्स्मध्ये वापरासाठी सौर ऊर्जेची निर्मितीही केली जाईल. रेल्वेसाठी पर्यायी इंधनाचा जास्तीत जास्त वापर करण्यावरही अर्थसंकल्पात भर असेल.