Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक सुरेश कारे यांना लोकमत जीवनगौरव पुरस्कार

By admin | Updated: April 25, 2015 01:28 IST

येथील मा. दीनानाथ मंगेशकर प्रेक्षागृहात लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्ताने गुरुवार दि, २३ रोजी आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात लोकमत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पणजी - येथील मा. दीनानाथ मंगेशकर प्रेक्षागृहात लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्ताने गुरुवार दि, २३ रोजी आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात लोकमत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
सुविख्यात उद्योगपती आणि इंडिको रेमेडिजचे चेअरमन सुरेश कारे यांना गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विरोधीपक्षनेते प्रताप सिंह राणे यांनी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्रबाबू दर्डा यांच्या उपस्थितीत तसेच अनेक ख्यातकिर्त गोमांतकीयांच्या हजेरीत पार पडलेल्या या सोहळ्यात मॉडर्न डिजी झोन (उद्योग), पराग रांगणेकर (पर्यावरण), श्रद्धानंद विद्यालय (शिक्षण), गो सेवा केंद्र (समाज सेवा) पुष्पाग्रज(साहित्य) गजेंद्रनाथ हळदणकर (कला आणि संस्कृती) आणि व्हिजन केअर हॉस्पिटल (आरोग्य) यांचा त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल लोकमत गौरव पुरस्काराने सन्मान केला गेला. 
 
यावेळी प्रक्षकांशी शकुंतला भारणे, सावनी रवींद्र, धवल चांदोलकर यांच्या सुरेल गाण्यांच्या तसेच हास्यसम्राट अजित कोष्टी यांच्या मिमिक्रीचाही अस्वाद घेतला. लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर महाव्यवस्थापक संजीव गुप्ते यांनी आभार मानले.