Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिरे विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:17 IST

नाशिक : सावतानगर येथील व्यंकटराव हिरे विद्यालयात स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे विभागीय समन्वयक आय. झेड. देसले, डी. एम. केदारे, एस. वाय. वडघुले व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष हरिष महाजन, राजेंद्र सावंत, सी. ए. पाटील उपस्थित होते.

नाशिक : सावतानगर येथील व्यंकटराव हिरे विद्यालयात स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे विभागीय समन्वयक आय. झेड. देसले, डी. एम. केदारे, एस. वाय. वडघुले व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष हरिष महाजन, राजेंद्र सावंत, सी. ए. पाटील उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजनानंतर कर्मवीर भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे यांच्या प्रतिमांचेही यावेळी पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापक आर. एम. पवार यांनी प्रास्ताविक करताना प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले. त्यांनी विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती दिली. विद्यालयात पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन एम. ए. बोरसे, एस. के. पगार व एम. ए. खैरनार यांनी केले. तर उपमुख्याध्यापक एम. एच. निकम यांनी आभार मानले.