Join us  

इंजिनिअर ते बँकर... गौतम ठाकूर म्हणतात, ‘स्वत:वर बंधने लादू नका!’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 2:02 AM

जबाबदारी पूर्ण करूनच राजकारणाचा विचार केला पाहिजे, असे म्हणणारे गौतम ठाकूर यांनी इंजिनिअर ते बँकर असा प्रवास करत, सारस्वत बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आहे

सचिन लुंगसे  

मुंबई : प्रत्येकाचे वेगवेगळे पैलू असतात. मी जेव्हा बँकेत असतो, बँकेच्या खुर्चीत असतो, तेव्हा मी बँकर असतो. फावल्या वेळेत मी माझे छंद जोपासतो. यातून बरेच काही शिकण्यास मिळते. मी राजकारणात येणार नाही. म्हणजे सध्या तरी तसा विचार नाही. सारस्वत बँक हे प्राधान्य आहे आणि राजकारण हा काही पर्याय नाही. राजकारणाकडे पर्याय म्हणून पाहू नये. प्रत्येकामध्ये लोकार्पण असले पाहिजे; पण संधी असेल तर नक्की विचार केला पाहिजे.

जबाबदारी पूर्ण करूनच राजकारणाचा विचार केला पाहिजे, असे म्हणणारे गौतम ठाकूर यांनी इंजिनिअर ते बँकर असा प्रवास करत, सारस्वत बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आहे. पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्याविषयी सर्वत्र चर्चा होत असतानाच, आशिया खंडातील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या सारस्वत या सहकारी बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्याशी गप्पा मारण्याचा योग जुळून आला. गप्पांच्या ओघात गौतम ठाकूर यांनी आपल्या आजवरच्या आयुष्याचा प्रवास उलगडला. त्यांनी सांगितले, की ‘सारस्वत बँकेचे अध्यक्ष असलेले माझे वडील एकनाथ ठाकूर यांचे निधन झाले आणि लगेचच मी बँकेचा अध्यक्ष झालो, असे झाले नाही. वडिलांच्या निधनानंतर दोन वर्षांनी मी बँकेत आलो. स्वत:ला सिद्ध केले आणि मग अध्यक्ष या नात्याने जबाबदारी घेतली. मी जेव्हा बँकेची जबाबदारी घेतली, तेव्हा बँक ५० हजार कोटींचा टप्पा गाठत होती. याच काळात बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, मी नेतृत्व स्वीकारले आणि स्वत:ला सिद्ध केले. एकनाथ ठाकूर यांचा मुलगा म्हणूनमला बँकेचे अध्यक्षपद नको होते किंवा मला तसे अध्यक्ष व्हायचे नव्हते. मी स्वत:ला सिद्ध करत येथे आलो. तुम्ही जेव्हा स्वत:ला सिद्ध करता, तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. आता बँकेचे काम जोमाने सुरू असून, बँक वेगाने पुढे जात आहे.

माझे वडील एकनाथ ठाकूर यांनी स्थापन केलेल्या नॅशनल स्कूल बँकिंगने तब्बल ९० हजार लोकांना नोकऱ्या दिल्या. करिअरच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, माझे मत असे आहे, की माणसाने स्वत:ला सीमांमध्ये बांधून ठेवता कामा नये. स्वत:वर बंधने घालून घेता कामा नयेत. आपण वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करू शकतो, असा विश्वास प्रत्येकाला असला पाहिजे. प्रत्येक क्षेत्र हे मोठे आहे. परिणामी, कष्ट घेतले तर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या क्षेत्रात यश मिळते. शिक्षण आणि काम या दोन्ही गोष्टी प्रत्येक वेळी एकत्र येतील असे नाही. बँकिंग क्षेत्रात सर्वच प्रवाहातील लोक काम करीत असतात. मुळातच बँकिंग हे काही मर्यादित करिअर नाही किंवा या क्षेत्रातील करिअरला मर्यादा नाहीत. बँकिंग क्षेत्रात जर अनुभवी माणसे काम करत असतील, तर बँकिंग क्षेत्राला त्याचा निश्चितच फायदा होतो.आशिया खंडातील सर्वांत मोठी सहकारी बँकव्यक्तीचे आयुष्य आणि संस्थेचे आयुष्य यात फार मोठा फरक आहे.व्यक्तीला मर्यादा असतात. संस्थेला मर्यादा नसतात.सारस्वत बँक १०१ वर्षांची झाली आहे.एकनाथ ठाकूर यांचे बँकेच्या यशात फार मोठे योगदान आहे.गेल्या दहा वर्षांत बँक आणखी मोठी झाली आहे.आशिया खंडातील ही सर्वांत मोठी सहकारी बँक आहे.बँकेचा व्यवसाय ६० हजार कोटी आहे.एकनाथ ठाकूर यांचे निधन झाले, तेव्हा मोठी पोकळी निर्माण झाली.आता नवी पिढी ही पोकळी भरून काढण्याचे काम करत आहे.

लेखक -

गौतम ठाकूरअध्यक्ष, सारस्वत बॅँक