नवी दिल्ली : सरकार या महिनाअखेर वेगवेगळ्या कंपन्यांना १७ फूड पार्कचे वाटप करू शकते. या फूडपार्कमध्ये जवळपास २,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर-बादल यांनी ही माहिती दिली. फूड पार्क मिळावेत असे प्रस्ताव आमच्याकडे आले होते व त्यांचे मूल्यांकन सध्या केले जात आहे. लवकरच आम्ही त्याचे वाटप करू शकू. मंगळवारी हरसिमरत कौर- बादल येथे भारतीय व्यापार संवर्धन संघटनेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय खाद्य आणि आतिथ्य मेळाव्याच्या उद््घाटन समारंभात बोलत होत्या. सरकारकडे अदानी समूह, आयटीसी आणि फ्यूचर ग्रुपसह वेगवेगळ्या १७ कंपन्यांचे फूड पार्कसाठी ७२ प्रस्ताव आले आहेत. त्यात प्रत्येकी १२५ कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.
या महिनाअखेर होईल १७ फूड पार्कस्चे वाटप
By admin | Updated: March 10, 2015 23:48 IST