Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ६ टक्क्यांनी वाढविणार

By admin | Updated: February 20, 2016 02:45 IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) ६ टक्क्यांनी वाढवून १२५ टक्के होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या महागाई भत्ता ११९ टक्के आहे. केंद्राच्या या निर्णयाचा एक

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) ६ टक्क्यांनी वाढवून १२५ टक्के होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या महागाई भत्ता ११९ टक्के आहे. केंद्राच्या या निर्णयाचा एक कोटीपेक्षा जास्त कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल.कॉन्फेडरेशन आॅफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्सचे अध्यक्ष के.के.एन. क्रुट्टी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, जानेवारी ते डिसेंबर २०१५ या दरम्यान ग्राहक मूल्य सूचकांक औद्योगिक श्रमिकचा सरासरी दर ६.७३ टक्के राहिला. त्यामुळेच सध्याच्या सूत्रानुसार महागाई भत्ता ११९ टक्क्यांवरून १२५ टक्के केला जाईल. डीएचे नवीन दर १ जानेवारी २०१६ पासून लागू होतील. त्याचा फायदा ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५५ लाख निवृत्तीधारकांना होईल.सध्याच्या निश्चित करण्यात आलेल्या सूत्रानुसार वित्त मंत्रालय प्रस्तावाचे आकलन करते आणि मंजुरीसाठी ते मंत्रिमंडळाकडे पाठविते. केंद्रीय मंत्रिमंडळ त्यावर शिक्कामोर्तब करते. औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या किरकोळ चलनवाढीच्या वर्षभरातील सरासरीवर केंद्र वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवू शकते. यापूर्वी सप्टेंबरमध्ये महागाई भत्ता ११३ टक्क्यांवरून वाढवून ११९ टक्के करण्यात आला होता आणि अंमलबजावणी जुलैपासून झाली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)