Join us

चितळे-जेऊर परिसरात हत्तींचा धुमाकूळ

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

आजरा : गेल्या आठ दिवसांपासून चितळे-जेऊर परिसरात हत्तींनी धुमाकूळ घातला असून, काजूची झाडे, मेसकाठ्या यांचे प्रचंड नुकसान केले आहे.

आजरा : गेल्या आठ दिवसांपासून चितळे-जेऊर परिसरात हत्तींनी धुमाकूळ घातला असून, काजूची झाडे, मेसकाठ्या यांचे प्रचंड नुकसान केले आहे.
एक दिवसाचा चंदगड तालुक्यातील कुरणी भागातील मुक्काम वगळता दररोज हत्ती चितळे-जेऊर परिसरात धुमाकूळ घालत आहे. बाळू सांबरेकर यांच्या शेतातील एक एकर उसासह काजूच्या झाडांचे नुकसान केले आहे. नरसू तरडेकर, जयसिंग सरदेसाई, पांडुरंग राणे, शंकर राणे, कृष्णा राणे, राजाराम सावंत, येसबा सांबरेकर, आदींच्या ऊसपिकांचेही नुकसान हत्तीने केले आहे.
वनखात्याचे कर्मचारी चितळे-जेऊर परिसरात तळ ठोकून आहेत. शेतालगतच्या जंगलातून येणार्‍या हत्तीला रोखण्यासाठी फटाके व सुतळी बॉम्बचा वापर करीत आहेत, परंतु याचा फारसा परिणाम होत नसल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
वनविभागाचे वनरक्षक के. एस. डेळेकर, पी. जी. पाटील, पी. एस. लटके यांच्याकडून हत्तींच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरू आहेत.