त्रिपुरा : त्रिपुरातून बांगलादेशला वीजपुरवठा करण्यात येणार असून, या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ मार्च रोजी रिमोट कंट्रोलने होणार आहे. बांगलादेशला ५.५ रुपये प्रति युनिटने वीज देण्यात येणार असून त्यासाठी ४७ कि.मी.ची वीज लाईन टाकण्यात आली आहे. त्रिपुराचे ऊर्जामंत्री माणिक डे आणि बांंग्लादेशचे उर्जा राज्यमंत्री नसिरुल हामित यांच्यात ढाका येथे ९ जानेवारी रोजी बैठक झाली होती. त्रिपुरातील गॅसवर आधारित पालाटाना वीज परियोजनेतून बांग्लादेशला १०० मेगावॅट वीज देण्यात येणार आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारताला १० जीबी इंटरनेट बँडविद प्रदान करणार आहेत.
बांगलादेशला त्रिपुरातून वीज
By admin | Updated: March 10, 2016 03:01 IST