Join us

वीज चोरीचे प्रमाण ३१.७२ वरून १४ टक्क्यांवर

By admin | Updated: July 22, 2015 23:38 IST

वीज चोरी हा दखलपात्र गुन्हा केला गेल्याने आणि राज्यातील वीज चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी १० वर्षांत योजलेल्या उपाययोजनांमुळे चोरीचे प्रमाण

पुणे : वीज चोरी हा दखलपात्र गुन्हा केला गेल्याने आणि राज्यातील वीज चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी १० वर्षांत योजलेल्या उपाययोजनांमुळे चोरीचे प्रमाण ३१.७२ वरुन १४ टक्क्यांपर्यंत आले आहे. ग्रामीण भागात विद्युत वाहक तारांंवर आकडी टाकून शेतीचे पंप सुरु केले जातात. शहरी भागात, विशेषत: व्यावसायिक दर आकारल्या जाणाऱ्या मीटरमध्ये काही ‘दुरुस्ती’ करुन चोरी केली जाते. महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांनी सांगिंतले की, वीज चोरीबाबत दाखल झालेले खटले, न्यायालयाने केलेल्या शिक्षा यांची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. १० वर्षांत केलेल्या उपाययोजनांमुळे वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले. जानेवारी २००६ मध्ये नागपूर, कल्याण, पुणे, लातूर, जालना व नाशिक अशा सहा ठिकाणी विशेष पोलीस ठाण्यांची स्थापना झाली