Join us

इलेक्ट्रिक फिटिंग होणार स्वस्त, जीएसटीत सवलत; वाइंडिंग वायर उद्योगाला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:00 IST

एसी असो वा फ्रीज किंवा अन्य कुठलेही इलेक्ट्रिक काम करायचे असल्यास कॉपर वायर हा महत्त्वाचा भाग असतो. जीएसटीमध्ये दिलासा मिळाल्याने ही वायर व त्यानिमित्ताने घराघरांतील इलेक्ट्रिक फिटिंग स्वस्त होणार असून

मुंबई : एसी असो वा फ्रीज किंवा अन्य कुठलेही इलेक्ट्रिक काम करायचे असल्यास कॉपर वायर हा महत्त्वाचा भाग असतो. जीएसटीमध्ये दिलासा मिळाल्याने ही वायर व त्यानिमित्ताने घराघरांतील इलेक्ट्रिक फिटिंग स्वस्त होणार असून, त्यामुळे वार्षिक ४० हजार टन उत्पादन असलेल्या या उद्योगाला संजीवनी मिळाली आहे.याआधी या वायरींवरील कर २० टक्क्यांच्या घरात होता, तर आयात शुल्क व काउंटर वेलिंग अधिभारासह आयातीत कॉपर वाइंडिंग वायरवरील कर २३ टक्के होते. जीएसटीमध्ये स्वदेशी कॉपर वाइंडिंग वायर २८ टक्क्यांच्या श्रेणीत गेली. त्यामुळे आयातीत वायर अधिक स्वस्त होऊ लागली. त्याचा या उद्योगाला फटका बसत होता.आता जीएसटी परिषदेने कॉपर वाइंडिंग वायरचा समावेश १८ टक्के श्रेणीत केला आहे. यामुळे आता इलेक्ट्रिक वायर स्वस्त होणार आहेत.चेम्बर आॅफ असोसिएशन्स आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडच्या (केमिट) जनसंपर्क विभागाचे अध्यक्ष मितेश प्रजापती यांनी सांगितले की, २८ टक्के जीएसटीचा थेट फटका बांधकाम व्यवसाय व घरांमधील इलेक्ट्रिक फिटिंगला बसत होता. त्याला हामोठा दिलासा आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न मार्गी लावल्याने केमिटने मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले.संघटनांकडून स्वागत-बॉम्बे मेटल एक्सचेंजचे हेमंत पारेख, स्टील युझर्स फेडरेशनचे अध्यक्ष निकुंज तुराकीआ, आॅल इंडिया इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे सरचिटणीस मितेश मोदी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

टॅग्स :जीएसटीअरूण जेटली