Join us

पं़स़ सभापती निवडी 14 सप्टेंबर रोजी

By admin | Updated: September 1, 2014 21:34 IST

सोलापूर :

सोलापूर :
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूक 21 सप्टेंबर रोजी घ्यावी तसेच 11 पंचायत समिती सभापतींची निवडणूक 14 सप्टेंबर रोजी घ्यावी, असे आदेश ग्रामविकास खात्याने जिल्हाधिकार्‍यांना पत्राद्वारे दिले आहेत़ अद्याप पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली नाही तरीही सभापतींची निवड जाहीर करण्यात आली आह़े अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पं़स़ सभापतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत़ त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आह़ेनिवडणुकीच्या तारखेबाबत जिल्हाधिकार्‍यांनी त्या त्या सदस्यांना नोटिसीद्वारे कळवावे, असेही पत्रात म्हटले आह़े