Join us

वीटभ˜ी मालकाला आठ दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST


अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण
नीरा : पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील एका वीटभ˜ीवर मोलमजुरी करणार्‍या मजुराच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिषे दाखवून परिंचे आणि वीर गावाच्या डोंगराळ भागात जबरदस्तीने नेऊन वीटभ˜ी मालकानेच तिच्यावर बलात्कार केला. सासवड पोलिसांनी या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या वीटभ˜ी मालकाला अटक केली आहे. नवनाथ तुकाराम कुंभार (वय २८ वर्षे, रा. परिंचे, ता. पुरंदर जि. पुणे) असे या नराधमाचे नाव आहे. दरम्यान, नवनाथ कुंभार याला सासवड पोलिसांनी पुण्यातील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिंचे येथील नवनाथ तुकाराम कुंभार याच्या मालकीच्या वीटभ˜ीवर एक अत्यंत गरीब कुटुंब मोलमजुरी करीत आहे. या मजूर कुटुंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला विविध आमिषे दाखवून त्याने काही दिवसांपूर्वी वीटभ˜ी परिसरात बलात्कार केला. तसेच वीर यात्रेदरम्यान संबंधित अल्पवयीन मुलीला सोन्याचे बनावट दागिने आणि पैसे देतो, असे आमिष दाखवून वीर डोंगराळ भागात जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची संबंधित मुलीने तिच्या आईला हकिगत सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या आईने सासवड पोलिसांकडे नवनाथ कुंभार याच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली.
याप्रकरणी अधिक तपास सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड, पोलीस उपनिरीक्षक नारायण गिते, आर. व्ही. माळेगावे करीत आहेत.