अभियंत्यांमध्ये विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता: गुडेवार
By admin | Updated: September 1, 2014 22:45 IST
सोलापूर: तांत्रिकदृष्ट्या प्रयोगाने निर्णय घेण्याची सवय अंगी बाळगून घेतली पाहिजे. यशस्वी जीवनाचे खरे रहस्य म्हणजे तत्काळ, अचूक आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता. ही क्षमता अभियंत्यांमध्ये असल्याचे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले.
अभियंत्यांमध्ये विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता: गुडेवार
सोलापूर: तांत्रिकदृष्ट्या प्रयोगाने निर्णय घेण्याची सवय अंगी बाळगून घेतली पाहिजे. यशस्वी जीवनाचे खरे रहस्य म्हणजे तत्काळ, अचूक आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता. ही क्षमता अभियंत्यांमध्ये असल्याचे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले.वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे, प्रा. अनिल अंकुलकर, एम. ए. कुलकर्णी, हरिभाऊ गोडबोले, अंकुर जोरीगल, जुगल जैन, शिवप्रसाद पोगूल, अदनान दोडमनी, शेख, प्रा. ए. एन. सुरडे, प्रा. पी. व्ही. साळुंखे उपस्थित होते. कोणत्याही कामामध्ये यशस्वी होण्यासाठी कार्य झोकून देऊन करावे. त्या कार्याकडे अत्यंत तटस्थपणे पाहण्याचीही आवश्यकता असते. कोणतेही निर्णय राजकीय दबावापोटी अथवा भावनिक होऊन घेऊ नये, असेही चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले. फोटो ओळी:::::::::::::::::::वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मेसाचे उद्घाटन करताना महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार. यावेळी प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे, प्रा. अनिल अंकुलकर, एम. एम. कुलकर्णी, हरिभाऊ गोडबोले आदी.